मुंबई : एकीकडे गॅस दरवाढीतून दिलासा मिळेल याची अपेक्षा सर्वसामान्य करीत असून दुसरी मात्र त्यात दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीय. महिन्याच्या पहिल्या दिवशी गृहिणींना महागाईपासून थोड्याफार प्रमाणात सुटका मिळाली होती.मात्र चौथ्या दिवशी यावेळी इंडियन ऑइल (Oil) कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 7 रुपयांनी (Oil) वाढ केली आहे.
यापूर्वी १ जुलै रोजी एलपीजीचे नवीन दर जाहीर करण्यात आले होते. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरच्या किंमती बदलत राहातात.
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, घरगुती सिलिंडर व व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता. मात्र यावेळी तेल कंपन्यांनी ४ जुलै रोजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.
गॅस सिलिंडरच्या किमतीत 7 रुपयाची वाढ करण्यात आल्याने आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंhडरवर १,७७३ रुपयांऐवजी १,७८० रुपये मोजावे लागणार आहे.
मात्र, अद्यापह इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर (Website) नवीन दर जाहीर केले गेले नाहीत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहीती एजन्सीकडून सांगण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून तेल कंपन्यांकडून सातत्याने कपात केली जात होती. 1 मार्च 2023 रोजी सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ते 2028 रुपये, मे मध्ये 1856.50 रुपये आणि 1 जून रोजी 1773 रुपये झाले. आता चार महिन्यांनंतर सिलिंडरची किंमत सात रुपयांनी वाढली आहे.