मुंबई । यंदा राज्यात मान्सून तब्बल १५ दिवस उशीराने दाखल झाला. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याने ही कसर भरून निघाली आहे. परंतु, राज्यात अद्याप शेतांमध्ये पेरणी करण्याइतका पाऊस झालेला नाही. दरम्यान, राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हे पण वाचा..
Hero चा ग्राहकांना मोठा झटका ! आता स्प्लेंडर खरेदी करणे महागणार, आजपासून किमतीत वाढ
शेअर बाजाराने गाठला नवा सार्वकालिक उच्चांक ; आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी मोठी वाढ
राष्ट्रवादीची अजित पवारांना धक्का देणारी मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
मोफत रेशन घेणार्यांसाठी सरकारची मोठी घोषणा! ऐकून आनंद होईल
भारतीय हवामान विभागने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सहाही जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकणासोबत मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. याठिकाणी हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर मराठवाड्यामध्ये हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात हुलकावणी?
राज्यातील इतर ठिकाणी पावसाने कहर केला असला तरी जळगाव जिल्ह्यात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस होत नसल्याने शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. मुसळधार पाऊस कधी होईल याची शेतकरी प्रतीक्षा करत आहे.

