मुंबई : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकला असू घड्याळाच्या चिन्हावरच निवडणुका घेणार असल्याचं सांगितलं. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ पैकी ४० आमदार असल्याचे सांगितले जाते. मात्र, यापैकी काही आमदारांनी माझ्याशी संपर्क साधला असून त्यांनी आपली भूमिका वेगळी असल्याचा दावा केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. ते रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल त्यांची विधानं होतं. त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगत असताना त्यांनी राज्य सरकारची लँड याचा उल्लेख केला. हा जो उल्लेख त्यांनी केला आणि राष्ट्रवादी पक्ष या भ्रष्टाचारात सहभागी आहे, असा उल्लेख केला. मला आनंद आहे की, आज मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याच मला आनंद असल्याचं शरद पवार म्हणाले.
यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, आमच्या पक्षातील काही सहकाऱ्यांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतली आहे. आम्हीच पक्ष आहोत, ही त्यांची भूमिका आहे. पक्षातील विधिमंडळातील सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली आहे, याचे चित्र आणखी दोन-तीन दिवसांत समोर येईल. कारण ज्यांची नावं आली आहेत. त्यापैकी काही जणांना माझ्याशी संपर्क साधला. काही लोकांनी मला सांगितलं की, आम्हाला निमंत्रित करण्यात आले, आम्ही सह्या केल्या आहेत. पण आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे.

