मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरु असून याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
सध्या प्रदेशाध्यक्षपदी असलेले जयंत पाटील यांनी आपल्या पदाची पाच वर्ष दोन महिने इतका कालावधी पूर्ण केला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या राजघटनेनुसार एका व्यक्तीला एका पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येत नाही. त्यामुळेच आता प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु झाली आहे.
हे पण वाचा..
यावल हादरले ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सहा वर्ष अत्याचार, तीन वेळा राहिली गर्भवती
तरुण फलाटावरील ट्रॅकच्या बाजूला हात धुत होता, इतक्यात लोकल आली अन्.. मृत्यूचा भयानक VIDEO
ठरलं! शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ महिलांना मिळणार संधी..
पात्रता फक्त 10वी पास अन् थेट केंद्रीय नोकरीची संधी..! SSC मार्फत 1558 जागांसाठी भरती
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरु झाली. आता प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
ऑगस्ट महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी आज पक्षांतर्गत वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.