मुंबई । कोणाचा मृत्यू कधी आणि कुठे होईल याचा नेम नाही. सध्या मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर एका १६ वर्षीय तरुणाचा रेल्वेच्या धडकेत एका मुलाचा मृत्यू झाला असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मयंक शर्मा (१६ वर्षे) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर होता. येथे त्याने मित्रासोबत टिफिनमधून जेवण घेतले. यानंतर दुसरा मुलगा त्याच्याकडून बाटली घेतो आणि हात धुवायला लागतो
मुंबई के मलाड में ट्रेन से टकराया युवक, CCTV फुटेज आया सामने#accident #mumbai #mumbaitrain #mumbaitrainaccident #mumbailocal #malad pic.twitter.com/2HmwylbnlL
— Shubham Rai (@shubhamrai80) June 30, 2023
तेवढ्यात एक लोकल ट्रेन रुळावर येते. ट्रेनचे इंजिन त्या मुलाच्या डोक्यावर आदळले आणि तो ट्रेनपासून लांब फेकला गेला आणि प्लॅटफॉर्मवर पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

