चाळीसगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांसह अल्पवयीन मुलीवर होणारे अत्याचार गेल्या काही काळात प्रचंड वाढले आहे. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच मात्र,चाळीसगाव तालुक्यातून वेगळीच घटना समोर आलीय. तालुक्यातील एक तरुणाने अल्पवयीन मुलीशी लग्न केलं. नंतर तिच्यावर मनाविरूध्द अत्याचार केला. याबाबत त्याचीच पत्नी पीडित मुलीने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
नेमकी काय आहे घटना?
चाळीसगाव तालुक्यातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तालुक्यातील सायगाव येथील तरुणाशी मार्च २०२३ मध्ये लग्न लावले. पिडीत मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असतांना तिच्या मनाविरोधात अत्याचार केला. त्यानंतर पिडीत मुलगी ही माहेरी निघून गेली. त्यानंतर तिचे पतीसह सासरचे मंडळी तिला घेण्यासाठी आले.
हे पण वाचा..
8 महिन्यांपासून महिलेचे चोरीला जात होते अंतर्वस्त्र! चोराला पकडण्यासाठी लढविली ‘ही’ शक्कल??
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढवला
..म्हणून अपघात झाला असावा ; बस अपघाताबाबत गिरीश महाजनांना शंका, काय म्हणाले पहा..
एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर ; जाणून घ्या स्वस्त झाला की महाग
त्यावेळी तिने जाण्यास नकार दिला. परंतू मुलीला नांदवण्यास पाठवा नाहीतर लग्नात लागलेले तीन लाख रूपये आम्हाला परत द्या अशी धमकी वजा दम करत मारहाण केली. अखेर पिडीत मुलीने मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहे.