मुंबई । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर मोठा गौप्यस्फोट केला असून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आशीर्वादानेच राज्यात भाजप-राष्ट्रवादीचं सरकार येणार होतं. त्यातूनच आम्ही पहाटेचा शपथविधी उरकला. त्यानंतर जे झालं ते तुम्हाला माहीत आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी कशी तयारी झाली होती? शरद पवार यांच्या उपस्थितीत कशा बैठका पार पडल्या होत्या याची माहितीच दिली आहे.
हे पण वाचा..
राज्य सरकारची शिधापत्रिकाधारकांना भेट! मिळणार 5 लाखांचा लाभ, जाणून घ्या कसं
जळगावसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना IMD चा अलर्ट जारी
उर्फी जावेद आता नवीन पराक्रम! VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल
राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार राज्यात स्थापन करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली होती. शरद पवार यांनी सर्व काही ठरलेलं असताना चार दिवस आधीच माघार घेतली. त्यामुळे अजित पवारांकडे दुसरा पर्याय नव्हता. आम्ही सत्ता स्थापनेची सर्व तयारी केली होती. त्यामुळे अजित पवारसोबत आम्ही सरकार स्थापन केलं.
शरद पवार यांनीच सरकार स्थापनेसाटी पुढाकार घेतला होता. त्यामुळे आपण शपथ घेऊ. शरद पवार आपल्यासोबत येतील. राष्ट्रवादीचे आमदारही सोबत येतील असं अजितदादांना वाटलं होतं म्हणूनच शपथविधी झाला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हे मी अंडरलाईन करतोय. त्या बैठकीत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचं ठरलं. कोणत्या प्रकारे सरकार स्थापन करायचं याची मोड्स ऑपरेंडी तयार झाली. सरकार स्थापनेचा करारही झाला होता. अजित पवार आणि मी हे पुढे नेणार असं ठरलं. आम्हा दोघांना अधिकार दिले गेले. त्या हिशोबाने आम्ही संपूर्ण तयारी केली. तयारीनंतर एका वेळी पवार त्यातून हटले. आमच्या शपथविधीच्या तीन चार दिवस आधी शरद पवार यांनी माघार घेतली, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.