नवी दिल्ली । दिल्लीतील एका मुलीच्या पीजी हॉस्टेलबाहेर एका तरुणाने अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी या प्रकारचे दोन व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले आहे आणि त्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या व्हिडिओत एक तरुण रात्रीच्या वेळी मुलीच्या पीजी हॉस्टेलबाहेर उभा राहूण अश्लील कृत्य करताना दिसत आहे.
स्वाती मालीवाल यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “आम्हाला दोन तक्रारी मिळाल्या की एक मुलगा रात्री मुलींच्या पीजी हॉस्टेलच्या बाहेर उभा राहून अश्लील कृत्य करतो. दोन्ही व्हिडिओ एकाच व्यक्तीचे असल्याचे दिसत आहे. दिल्ली पोलिसांना हजेरीचे समन्स बजावले असून कारवाईचा अहवाल मागवला. ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलंय.
हमें दो शिकायतें मिली कि Girls PG के बाहर एक लड़का रात में सड़क पर खड़ा होकर Masturbation करता है। दोनों वीडियो एक ही शख़्स की लग रही हैं। दिल्ली पुलिस को हाज़िरी समन जारी कर Action Taken रिपोर्ट माँगी है। ये मामला बेहद गंभीर है।
Warning – Disturbing Content pic.twitter.com/vIga4CXHEf
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) June 26, 2023
आउटलुकमधील एका रिपोर्टनुसार, दिल्ली महिला आयोकडे एक तक्रार करण्यात आली होती. त्यात 12 जूनच्या मध्यरात्री एक पुरुष पीजी निवासस्थानाबाहेर उभा राहिला आणि बाल्कनीत उभ्या असलेल्या काही महिलांकडे एकटक पाहत असताना त्याने अश्लील कृत्य केले.