मुंबई : मागील काही काळात राज्याच राजकारण विविध करणामुळे ढवळून निघाले असल्याचे पाहायला मिळाले. यात राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असला तरी राज्यातील सरकार काही गेलं नाही. यामुळे शिंदे फडणवीस सरकारला दिलासा मिळाला आहे. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण आणि पक्ष चिन्ह दिल्यानंतर शिंदे गटाने राज्यातील महापालिकांमधील कार्यालये ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. युनियनची कार्यालयही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. ते प्रकरणही मुंबई उच्च न्यायालयात गेलं. या प्रकरणात ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिकमधील म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या लढाईत उद्धव ठाकरे गटाची सरशी झाली आहे. शिंदे गटाने म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या कार्यालयावर दावा सांगितल्यामुळे नाशिक पोलिसांनी या कार्यालयाला टाळं ठोकलं होतं.
हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं असता कोर्टाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला. या प्रकरणात शिंदे गटावर सरशी केल्यानंतर ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या कार्यालयाचं सील उघडलं जाणार आहे.आता म्युनिसिपल कर्मचारी दालनाचा ताबा ठाकरे गटाकडे गेला आहे.

