जळगाव । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केलेल्या पाच कोटींचा अब्रू नुकसानीचा खटला न्यायालयात सुरु आहे. आज याप्रकरणी सुनावणी पार पडली असून दोन्ही न्यायालयात हजर होते. यावेळी दोघांकडून गैरसमजतीतून हा प्रकार झाला होता त्यानंतर दोघांमध्ये आपसात तडजोड तसेच समझोता झाल्यानंतर दोघांकडून लेखी घेण्यात येऊन हा खटला मागे घेण्यात आला. पाच कोटींच्या अब्रू नुकसानीचा हा दावा मागे घेण्यात आल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे
विद्यामान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २०१६ साली केलेल्या वक्त्यव्याविरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला होता. गुलाबराव पाटील यांनी खडसे यांच्यावरिल भ्रष्टाचाराच्या आरोपांसंबंधीत एक वक्तव्य केलं होतं. यावरून हा खटला दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात समेट झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यायलयात सुरू असलेल्या या खटल्यात दोन्ही नेत्यांनी तडजोड करून हे प्रकरण मिटवण्यात आलं आहे.
एकीकडे एकनाथ खडसे यांनी एकनाथ शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांच्याशी समझोता केला आहे, मात्र आज जळगावातील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यावर ते ठाम आहेत.
आज जळगावमध्ये शिंदे-फडणवीस सरकारकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम जळगावमध्ये होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमात एकनाथ खडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यावर ठाम आहे.