जळगाव – दीपस्तंभ फाउंडेशन संचलित मनोबल हा प्रकल्प मागील वर्षांपासून पुण्यात सुरु झाला आहे. या अंतर्गत बारावीच्या पूढील व विशेषतः पदवीधर असलेल्या सर्व प्रकारच्या अपंग व अनाथ विद्यार्यांना विनामूल्य निवासी स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण (UPSC, MPSC, Relve, बँक, स्टाफ सिलेक्शन इत्यादी) देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने भरीव सहकार्य केले आहे.
या अंतर्गत या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहकार्य मिळेल तसेच स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन मिळेल, निवास भोजनाची एकाच ठिकाणी निःशुल्क व्यवस्था मिळेल. या व्यतिरिक्त व्यक्तिमत्व विकास, करिकर कौन्सिलिंग, कम्प्युटर प्रशिक्षण, मोबॅलिटी व कौशल्ये प्रशिक्षण ही देण्यात येणार आहे. हा प्रकल्प लोकसहभागातून व देणग्यांमधून चालवण्यात येतो.
या प्रकल्पामध्ये सुमारे 75% जागा या अपंग व अनाथ मुलामुलींसाठी असतील व 25% जागा समाजातील सर्वसामान्य अत्यंत होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील. अशा विद्यार्यांनी या सुवर्णसंधी चा लाभ घ्यावा. उच्च शिक्षणासाठी, प्रोफेशनल कोर्स साठी पुण्यात येणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. अशा प्रकारच्या सर्व विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या इ-मेल वर संपूर्ण माहिती पाठवावी. यामध्ये संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर, इ मेल, आई वडीलांचे नाव, व्यवसाय, एकुण खरं उत्पन्न, अपंगत्वाचा प्रकार, अनाथ असल्यास एखाद्या व्यक्तिची ओळख नाव पत्ता फोन नंबर यासह कोणत्या प्रकारचे शिक्षण घेणार आहात? स्पर्धा परिक्षांपैकी कुठल्या परिक्षांची तयारी करायची आहे या विषयीची माहिती त्वरित खाली दिलेल्या इ मेल वर पाठवावी. खाली दिलेल्या फोन नंबर वरही आपण संपर्क करु शकता. 27 जुन पर्यंत हे अर्ज स्वीकारले जातील. 1 जुलै पासून हा निवासी प्रकल्प सुरु होणार आहे.
हे प्रकल्प पुणे आणि जळगांव इथे कार्यरत असुन या प्रकल्पात दरवर्षी 300 विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार केली जाते. आजवर संस्थे मार्फत 500 हून अधिक अपंग व अनाथ5 विद्यार्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील सुमारे 1400 विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षा प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. तसेच अपंग अनाथ प्रवर्गातील 48 हून अधिक व ग्रामीण, आदिवासी गरिब होतकरु असे 180 हून अधिक विद्यार्थी निरनिराळ्या पदांवर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
प्रा.यजुर्वेंद्र महाजन
संस्थापक दीपस्तंभ फाउंडेशन
जळगाव /पुणे
ईमेल:
deepstambhngo@gmail.com
जळगाव पत्ता:-४२, हौसिंग सोसायटी, सहयोग क्रिटीकल केअर हॉस्पिटल जवळ,जळगाव ४२५००१
संपर्क – 8380038714
पुणे पत्ता – जुनी मनपा शाळा, पिंपळे गुरव बस स्टॉप जवळ, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड, पुणे.
संपर्क – 9850322678
अधिक माहितीसाठी
वेबसाईट: www.deepstambhfoundation.org
यूट्यूब: Deepstambh Foundation