मुंबई । सोने-चांदी खरेदी करणाऱ्यासाठी खुशखबर आहे. जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत घट झाल्यामुळे सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण होत असल्याचं पाहायला मिळतंय. या आठवड्यात सोने किंमती 600 रुपयांनी घसरल्या तर चांदी 2500 रुपयांनी आपटली. किंमती 60 हजारांपेक्षा खाली आल्याने सराफा बाजारात वर्दळ वाढली आहे.
सोने या आठवड्यात दणकावून आपटले 19 जून रोजी प्रति 10 ग्रॅम किंमतीत 50 रुपयांची घसरण होऊन 24 कॅरेट सोने 60,210 रुपयांवर आले. त्यानंतर 20, 21 आणि 22 जून रोजी भावात सातत घसरण होत गेली. अनुक्रमे 60, 330 आणि 220 रुपयांनी भाव दणकावून आपटले. गुरुवारी संध्याकाळी भाव 59,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरले. गुडरिटर्न्सवर हे भाव अपडेट झालेले आहेत.
चांदी 2500 रुपयांनी स्वस्त
चांदीने मध्यंतरी चमक दाखवली होती. भावात चांगली वाढ झाली होती. 19 जून रोजी भावात मोठी तफावत नव्हती. 20 जून रोजी किंमती 500 रुपयांनी वधारल्या. तर 21, 22 आणि 23 जून रोजी भावात 2500 रुपयांची घसरण झाली. अनुक्रमे 1000,1000आणि 500 रुपयांची घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सवर हे भाव अपडेट झालेले आहेत.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
गुरुवारी, 22 जून रोजी 24 कॅरेट सोने 58,654 रुपये, 23 कॅरेट 58,419 रुपये, 22 कॅरेट सोने 53,727 रुपये, 18 कॅरेट 43,991 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34313 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. चांदीत प्रति किलो 9 रुपयांची वाढ होऊन एक किलोचा दर 70,133 रुपये झाला. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.