बुलढाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या अपघाताचे वाढताना दिसत आहे. धावत्या बसला आग लागल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. अनेक बसेस ची दुरावस्था झालीय तरी देखील त्या बसेस रस्त्यावर धावत आहे. दरम्यान अशातच मलकापूर– सोलापूर मार्गावरील हातनी गावानजीक एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला आहे.
एसटीचे ब्रेक फेल झाल्याने एसटी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात गेली. यात अपघातात ६ प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. एसटी भंगार रस्त्यावर धावत असून प्रवाश्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे सिद्ध झाले आहे.
चिखलीवरून बुलढाण्याकडे राज्य परिवहन महामंडळाची एसटी निघाली होती. एसटीमध्ये ७० पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. या दरम्यान हातनी जवळील एसटी उंच भागातील रस्ता चढत असताना अचानक एसटीचे ब्रेक फेल झाले. यामुळे एसटी रिव्हर्स मागे जायला लागली. एसटीमधील प्रवाश्यांनी आरडा ओरड केली. पण चालकाच्या सावधानतेने (St Bus) बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात जाऊन थांबली.
सदरच्या मार्गावर वाहनांची चांगलीच वर्दळ असते. मात्र तेवढ्या वेळात कोणताही वाहन रस्त्यावर नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात ६ प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

