पुणे | पुणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षकेत्तर क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांची तात्पुरत्या स्वरूपात भरती केली जाणार आहे.
एकूण ६ पदे ४५ दिवसाकरिता एकवट मानधनावर भरण्यात येणार असून त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवाराने आपला अर्ज नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित छायांकित एक प्रत (Print Copy / Hard Copy), स्वयं प्रमाणपत्र, छोट्या कुटुंबाचे प्रमाणत्रासह भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे येथे दिनांक २६/०६/२०२३ ते २७/०६/२०२३ रोजी कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावयाचा आहे.
शैक्षणिक पात्रता :
या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदवी परीक्षा (Bsc) असून वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच या पदासाठी इच्छूक उमेदवारांनी इंग्रजीमध्ये 40 W.P.M पेक्षा कमी नसलेल्या गतीसाठी टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, तर मराठी 30 W.P.M. गती असावी.
मिळणारा पगार किती?
निवड झालेल्या उमेदवारांना महिना Rs. 21,525/- मानधन मिळेल.
या पदासाठी उमेदवारांना अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे. टपालाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी वेबसाईटवर www.punecorporation.org प्रसिध्द करणेत येतील. दिनांक २७/०६/२०२३ नंतर आवेदनपत्र सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.