मुंबई । शेअर बाजारात आज घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही लाल चिन्हात बंद झाले. यासह सेन्सेक्सने आज पुन्हा एकदा आपला सार्वकालिक उच्चांक प्रस्थापित केला, मात्र त्यांनतर काही वेळातच सेन्सेक्स आपला सार्वकालिक उच्चांक जास्त काळ राखू शकला नाही आणि तेथून घसरत राहिला. याशिवाय आज बाजारात अनेक शेअरमध्ये विक्रीचा कल दिसून आला होता.
आज सेन्सेक्सने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्सने आज 63601.71 चा उच्चांक गाठला आहे. मात्र, उच्चांक गाठल्यानंतर सेन्सेक्स खाली येत राहिला. आज सेन्सेक्स २८४.२६ अंकांच्या (०.४५%) घसरणीसह ६३२३८.८९ या पातळीवर बंद झाला.
निफ्टी
यासोबतच निफ्टीमध्येही घसरण झाली आहे. निफ्टीने आज 18886.60 चा उच्चांक आणि 18759.50 चा नीचांक गाठला. शेवटी, निफ्टी 85.60 अंकांनी (0.45%) घसरला आणि 18771.25 च्या पातळीवर बंद झाला. आज बाजारात अनेक समभागांमध्ये घसरणीचे वातावरण होते.
टॉप गेनर्स आणि टॉप लॉसर्स
टाटा स्टील, बजाज फायनान्स, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स, टाटा मोटर्स आणि एशियन पेंट्स हे आज निफ्टीमध्ये घसरले. डिव्हिस लॅबोरेटरीज, एल अँड टी, एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेल यांचा सर्वाधिक फायदा झाला. याशिवाय पीएसयू बँक आणि पॉवरसह सर्व क्षेत्रे घसरली. तेल आणि वायू, धातू, एफएमसीजी, फार्मा, आयटी सर्व ०.५ टक्क्यांनी घसरले. यासह बीएसई मिडकॅप 1 टक्के आणि स्मॉलकॅप 0.6 टक्क्यांनी घसरले होते.

