जळगाव | जळगाव शहरातील एक व्यावसायिकाला हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्याच्याकडून ७ लाख ७७ हजार रुपये उकळल्याची घटना उघड झाली आहे. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित व्यवसायिकाने सायबर पोलीस स्टेशनला धाव घेत अज्ञात रिया अग्रवाल नामक अकाउंट धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा..
लाच भोवली ! लाच स्वीकारताना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार अडकला
म्हणून MPSC उत्तीर्ण दर्शना पवारचा खून केला ; कारण कारण ऐकून पोलिसही हादरले
..म्हणून एकनाथ खडसेंना न्यायालयाने ठोठावला दंड
राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1500 कोटीचा निधी वितरित होणार : कोणत्या जिल्ह्याला किती मदत?
शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये मिनरल वॉटरचा व्यवसाय करणाऱ्या ५१ वर्षीय व्यावसायिकाला १६ ते १९ जूनच्या दरम्यान त्यांच्या फेसबुक खात्यावर रिया अग्रवाल नामक खातेधारकाने फिर्यादी यांच्याशी मेसेंजर वर चॅटिंग व व्हिडिओ कॉल करून ओळख निर्माण केली. त्यानंतर फिर्यादीशी गोड गोड बोलून त्याचा नग्न व्हिडिओ तयार केला.
त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. संशयित आरोपीच्या बँक व मोबाईल मधील गुगल पे खात्यामध्ये फिर्यादी यांनी वेळोवेळी ७ लाख ७७ हजार ७४५ रुपये पाठविले. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रिया अग्रवाल नामक अकाउंट धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर करीत आहेत.