जळगाव । बांधकाम करणाऱ्या तरूणाचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. शेख समीर शेख राज मोहम्मद (वय-२२) रा. इंदिरा नगर, शाहू नगर, जळगाव असे मृत झालेल्या तरूणाचे नाव असून ही घटना शहरातील कालिंका माता मंदीर परिसरात आज बुधवारी दुपारी घडलीय.
शेख समीर हा आपल्या आई व लहान भावासोबत शाहू नगरातील इंदिरात नगरात वास्तव्याला होता. बांधकामाच्या ठिकाणी मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. सध्याचे त्याचे खेडी शिवारातील कालिंका माता मंदीर परिसरात बांधकामाचे काम सुरू होते. बुधवारी २१ मे रोजी दुपारी १ वाजता बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या बोरींगच्या वायर स्पर्ध झाल्याने शेख समीर याला जोरदार वीजेचा धक्का बसला.
हे पण वाचा..
लाज सोडली! मेट्रोत कपलचा लिपलॉक किस करतानाचा VIDEO व्हायरल
वारकऱ्यांसाठी राज्य सरकारतर्फे विमा संरक्षणाची घोषणा
12 वी उत्तीर्ण महिलांसाठी सुवर्णसंधी..! राज्यातील या जिल्ह्यात 154 पदांवर बंपर भरती*
Jalgaon :पत्नीची हत्या करून साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा
त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरीक व बांधकाम करणारे कामगारांनी धाव घेत वीजपुरवठा बंद करून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत पोलीसात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.