पुणे । पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका पशुवैद्यकीय डॉक्टरने संपूर्ण कुटुंबच संपवल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला असून या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
डॉ अतुल शिवाजी दिवेकर, पत्नी-पल्लवी-अतुल दिवेकर, वेदांतीका (मुलगी),अदत्विक (मुलगा) अशी मृतांची नावे आहेत. दौंड येथील चैताली पार्क परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहे.
हे पण वाचा..
15 महिन्यात सातव्यांदा आत्मदहनाचा प्रयत्न ; जळगाव झेडपी समोर तरुणाने अंगावर ओतले पेट्रोल
महत्वाची बातमी! भारतीय कफ सिरप कंपन्यांबाबत WHO ने घेतला मोठा निर्णय
राज्यातील महिला आमदाराचा व्हिडीओ व्हायरल! अभियंत्याला शिवीगाळ करत लगावली कानशिलात
अतुल दिवेकर हे व्यवसायाने पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. त्यांची पत्नी पल्लवी या शिक्षिका आहे. हे कुटुंब वरवंड येथील गंगासागर पार्कमधील रुम नंबर 201मध्ये राहत होते. त्याने पत्नीचा गळा दाबला. त्यानंतर दोन मुलांना विहिरीत टाकून त्यांची हत्या केली. नंतर दिवेकर घरी आले आणि त्यांनी घरात आत्महत्या केली. एक हसतखेळतं कुटुंब काही तासात संपुष्टात आलं.
कौटुंबिक वादातून त्यांनी हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गेल्यावर पोलिसांना अतुल आणि पल्लवी यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना तात्काळ मृतदेह ताब्यात घेतले. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.