मुंबई : शिवसेना पक्षाचा उद्या वर्धापनदिन आहे. वर्धापन दिनापूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईत महाशिबिर पार पडणार आहे. त्याआधी ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याची चर्चा आहे.
आज मुंबईत ठाकरे गटाकडून महाशिबिराचे आयोजन करण्यात आले असून मात्र, मनिषा कायंदे या शिबिरात फिरकल्याच नाहीत. त्यांचा फोनही नॉट रिचेबल लागत असल्याने चर्चा सुरु झाल्या. अखेर मनिषा कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अद्याप मनिषा कायंदे किंवा शिंदे गटाकडून यासंदर्भात कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, मनिष कायंदे यांच्या शिंदे गटात जाण्याने आम्हाला फारसा फरक पडणार नाही. इतके आमदार आणि खासदार शिवसेना सोडून गेले, तेव्हाही आमचा पक्ष तसूभर ढळला नाही. अशाप्रकारचा कचरा इकडून तिकडे जात असतो, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि संजय राऊत यांनी व्यक्त केली.
हे पण वाचाच..
जुन्या वादातून तरुणाला संपविले! भुसावळ तालुक्यातील धक्कादायक घटना
५ वर्षांच्या बालिकेवर दोन अल्पवयीन मुलांनी केला आळीपाळीने अत्याचार
आजपासून हिरवी वांगी खाणे सुरू करा : फायदे जाणून व्हाल चकित
काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला. शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र सुपूर्त केलं. आपल्याला ठाकरे गटात मनासारखं काम करायला मिळत नसल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. पक्षात होणारी घुसमट आपणच थांबवत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.