भुसावळ । आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त जळगांव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी व भाविकांसाठी मध्य रेल्वे तर्फे पंढरपूर वारीसाठी अनआरक्षित “विशेष आषाढी” रेल्वे गाडी धावणार आहे.
दि.२८ जून रोजी दु.१.३० वा. भुसावळ स्टेशन येथून रेल्वेगाडी सुटून दि.२९ जून रोजी पहाटे ३.३० वा. पंढरपूर येथे पोहचणार आहे, तर त्याच दिवशी रात्री १०.३० वा. परतीसाठी निघणार असून, दि.३० जून रोजी दि.१.३० भुसावळ येथे पोहचणार आहे याबाबत माहिती दिली.
भुसावळ – पंढरपूर – भुसावळ “विशेष आषाढी रेल्वे” सोडण्यात येत असुन याचा परिसरातील असंख्य वारकरी भाविकांना लाभ होत आहे. सदर रेल्वेत मोफत तिकीट, नाश्ता, जेवण, फराळ व पाण्याची स्वखर्चाने व्यवस्था केलेली आहे. कोविड-१९ महामारीमुळे सदर रेल्वे गाडी दोन वर्ष बंद करण्यात आली होती, त्यामुळे परिसरातील अनेक वारकऱ्यांचा हिरमोड होऊन त्यांना विठूरायाच्या दर्शनापासून वंचित राहावे लागले होते. मात्र मागील वर्षी माझ्या प्रयत्नाने सदर गाडी पुन्हा चालू झाली होती आणि यावर्षी सुद्धा विठ्ठलाच्या कृपेने सदर रेल्वेद्वारे वारकऱ्यांना पंढरपूर वारी घडणार आहे.