राजकोट : चक्रीवादळ बिपरजॉय आज गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असून चक्रीवादळासोबतच मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला असून केंद्र आणि राज्य सरकारने गुजरातच्या किनारपट्टी भागात राहणाऱ्या हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.
दरम्यान, चक्रीवादळाच्या आधीच गुजरातमध्ये जोरदार वारे वाहत आहेत. यामुळे किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड उडून गेलेत तर काही ठिकाणी वाहनांचेही नुकसान झाले आहे. आता एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये पार्किंग करण्यात आलेल्या दुचाकी वाऱ्याने सरकल्याचं दिसत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ येण्याआधी अशी अवस्था आहे तर ते आल्यानंतर किती भयंकर असेल अशा कमेंट्स युजर्स करत आहेत.
Rajkot
See the effect of #CycloneBiparjoy
Photos of effect of strong winds in Rajkot.#BiparjoyCyclone #CycloneBiporjoy #CCTV #Gujaratcyclone #RajkotCity pic.twitter.com/dxsCKQ0O2g— Prateek Pratap Singh (@PrateekPratap5) June 14, 2023
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर एका युजरने म्हटलं की, “चक्रीवादळ जाऊदे फक्त, सर्वजण सुरक्षित रहावेत हीच प्रार्थना.” गुजरातच्या किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत असून आकाशात काळे ढगही जमा झाले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेतला आहे. लष्कराचे तिन्ही दल परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.