DRDO च्या रिक्रूटमेंट अँड असेसमेंट सेंटरअंतर्गत (RAC) विविध जागांवर भरती निघाली आहे. एकूण 181 वैज्ञानिक बी पदांसाठी ही भरती केली जात आहे.
या भरतीची जाहिरात 25 मे रोजी प्रसिद्ध झाली. उमेदवारांनी हे लक्षात घ्या की RAC वेबसाइटवरील ऑनलाइन नोंदणी लिंक 21 दिवसांच्या आत बंद होईल.
किती पगार मिळेल?
(Rs.56,100/-) लेव्हल-10 मध्ये (7वी CPC)
रिक्त पदांचा तपशील
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग – 49 पदे
मेकॅनिकल इंजिनिअरिंग- 44 पदे
कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग – 34 पदे
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – 05 पदे
मटेरियल इंजिनीअरिंग/मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग/मेटलर्जिकल इंजिनिअरिंग – 10 पदे
फिजिक्स – 10 पदे
केमिस्ट्री – 05 पदे
केमिकल इंजिनिअरिंग – 13पदे
एरोनॉटिकल/एरोस्पेस इंजिनिअरिंग – 07 पदे
गणित – 02 पदे
सिव्हिल इंजिनिअरिंग – 02 पदे
आवश्यक पात्रता :
या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या अधिसूचनेवरून तुम्ही पाहू शकता. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, जनरल आणि इडब्ल्यूएससाठी वयोमर्यादा 28 वर्षे आहे, तर आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.
अर्जाची शुल्क
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी जनरल, इडब्ल्यूएस आणि ओबीसी पुरष श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर एसटी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.