सध्याच्या काळामध्ये तरुण पिढी नैराश्येत येऊन आयुष्य संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसते. सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा आत्महत्येच्या प्रयत्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काळजाचा थरकाप उडवणारा या व्हिडिओने नेटिझन्सला विचार करायला लावले आहे.
व्हिडिओमध्ये तरुण प्लॅटफॉर्मवर उभा असल्याचे दिसत आहे. अचानक तो रुळावरून खाली जातो आणि रुळावर आडवा होतो. तो तरुण रुळावर डोकं ठेवून पडून होता. तो आत्महत्या करणार होता.
https://twitter.com/RPF_INDIA/status/1666705743280734208
सुदैवाने दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका लेडी कॉन्स्टेबलची नजर त्याच्यावर पडते. त्यानंतर ही लेडी कॉन्स्टेबल जीवाची पर्वा न करता रुळावर उडी मारली आणि ट्रेन येण्यापूर्वीच या तरुणाला बाजूला ओढते. हे पाहून दोन व्यक्ती या कॉन्स्टेबलच्या मदतीला येतात. त्यानंतर हे तिघे मिळून या तरुणाला प्लॅटफॉर्मवर आणतात. लेडी कॉन्स्टेबलच्या प्रसांगवधानामुळे या तरुणाचा जीव वाचतो.
या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ आरपीएफ इंडियाने ट्विटरवर शेअर केला आहे. सुमती असे या लेडी कॉन्स्टेबलचे नाव आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर रेल्वे स्थानकावर घडली असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

