पुणे : गेल्या काही दिवसांपासून ज्याची प्रतिक्षा होती, तो मान्सून आला आहे. केरळनंतर आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. आज ११ जून रोजी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्यात कोकणात पाऊस सुरु झाला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर पाऊस पडत होता. पुढचे दोन दिवस चक्रीवादळाचे परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवणार आहे. पुढील दोन दिवस वेगवान वाऱ्यांसह पावसाचा हवामान खात्याचा इशारा दिला होता.
हे पण वाचा..
ना पीए, ना पोलीस सुरक्षा; गिरीश महाजनांचा नांदेड ते मुंबई एकट्याने रेल्वे प्रवास
थाटामाटात लग्न लावून नवरीला घरी आणलं, नवरदेव हनिमूनची वाट पाहत होता, अन् तिकडे.
10वीत सायन्स नसेल तर..! मुंबई हायकोर्ट त्या विद्यार्थ्याच्या बाजूने दिला निर्णय, नेमकं प्रकरण काय?
सोफिया अन्सारीचा हटके अंदाज! फोटो पाहून तुमच्याही हृदयाचे ठोके वाढतील ..
किनारपट्टीवर ताशी ३० ते ४० किलोमिटरने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच कोकणात अनेक भागात मान्सून पूर्व पाऊसाच्या सरी होत होत्या. परंतु आता मान्सून दाखल झाला आहे. ११ जून रोजी दुपारी १.३० वाजता राज्यात मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली.
यामुळे आता शेतकरी बांधवानी मशागतीची कामे पूर्ण करावी अन् पेरणीसाठी तयार राहावे, परंतु पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करु नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.