मुंबई :एखादा मंत्री असो वा एखादा खासदार,आमदार त्यांच्या अवती भवती तुम्हाला त्यांचे पीए किंवा पोलीस सुरक्षाकर्मी त्यांच्यासोबत दिसतात. दौऱ्यावर जाताना तर अनेकदा नेत्यांसोबत पीए आणि पोलीस पहायला मिळतात. मात्र ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे या सर्व प्रकाराला अपवाद आहेत.
गिरीश महाजन यांनी कुणालाही न घेताच नांदेड ते मुंबई असा रेल्वेने एकट्यानी प्रवास केला. विशेष बाब म्हणजे गिरीश महाजन स्वतःच्या बॅगा स्वतः हातातून घेऊन जात होते. गिरीश महाजन यांना याबाबत विचारले असता मी आमदार असल्यापासूनच एकटा प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल नांदेडला सभा होती. सभेला उशिर झाल्याने रात्री कुठलाच पर्याय नसल्याने गिरीश महाजन यांना ट्रेनने मुंबईला यावं लागलं. मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रात्री नागपूरला जाऊन पुन्हा 10.30 वाजता मुंबईला येणार होतो. कार्यक्रमाला उशीर झाल्याने ते शक्य नव्हतं. त्यामुळे नांदेडला मी ट्रेन गाठून मुंबईला आलो. ठाण्याला माझी सकाळी सभा होती. त्यामुळे मी ट्रेनला बसलो. माझ्यासोबत पीए नाही, बॉडीगार्डही नाही, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
हे पण वाचा..
थाटामाटात लग्न लावून नवरीला घरी आणलं, नवरदेव हनिमूनची वाट पाहत होता, अन् तिकडे.
10वीत सायन्स नसेल तर..! मुंबई हायकोर्ट त्या विद्यार्थ्याच्या बाजूने दिला निर्णय, नेमकं प्रकरण काय?
सोफिया अन्सारीचा हटके अंदाज! फोटो पाहून तुमच्याही हृदयाचे ठोके वाढतील ..
लाच घेणाऱ्या पुण्यातील IAS अधिकाऱ्याबाबत CBI तपासात धक्कादायक बाब उघड
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना ९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त वाय+ (Y+) सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी अतिरिक्त वाय+ सुरक्षा देखील नाकारली होती.
पोलीस दलावर अतिरिक्त भार येऊ नये म्हणून यापूर्वीच मी वाय+ सुरक्षा नाकारली आहे आणि प्रवासात सुरक्षा व्यवस्था असली की प्रत्येक स्टेशनला 10 अतिरिक्त पोलीस बदलत राहतात. यामुळे नागरीकांना देखील त्रास होतो. त्यांची गैरसोय होते आणि पोलीस दलावरही भार वाढतो म्हणून गेली 30 वर्ष आमदार आणि मंत्री असतानाही एकट्याने प्रवास करतो अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.