मुंबई । मुंबईच्या मालाड परिसरातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हनिमूनच्या रात्रीच नव्या नवरीने घरातील रोकड, दागिने घेऊन पसार झाली. पळून जाताना तिने लग्नातील दागिने सुद्धा लंपास केले. याप्रकरणी नवऱ्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून लग्न जमवून देणाऱ्या दलालास ताब्यात घेतलं आहे.
कमलेश कदम असं अटक करण्यात आलेल्या दलालाचं नाव आहे. नवरी मुलगी अद्यापही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मालाड परिसरात राहणाऱ्या वृषभ मेहता या तरुणाचे लग्न जमत नव्हते. त्यामुळे लग्नासाठी मुलगी मिळावी म्हणून वृषभने कमलेश कदम या दलालाची भेट घेतली.
कमलेशने १५ हजार रुपये घेऊन आशा गायकवाड या ३० वर्षीय तरुणीसोबत वृषभचे लग्न लावून दिले. थाटामाटात लग्न लागल्यानंतर वृषभ नवरीला घेऊन घरी आला. घरात नववधूचे आगमन झाल्यामुळे वृषभचे कुटुंबिय आनंदात होते.
हे पण वाचा..
10वीत सायन्स नसेल तर..! मुंबई हायकोर्ट त्या विद्यार्थ्याच्या बाजूने दिला निर्णय, नेमकं प्रकरण काय?
सोफिया अन्सारीचा हटके अंदाज! फोटो पाहून तुमच्याही हृदयाचे ठोके वाढतील ..
लाच घेणाऱ्या पुण्यातील IAS अधिकाऱ्याबाबत CBI तपासात धक्कादायक बाब उघड
सावधान! बिपरजॉय चक्रीवादळ पुढील काही तासांत अधिक तीव्र होणार ! IMD अलर्ट जारी
मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. हनिमूनच्या रात्रीच नव्या नवरीने घरातील दीड लाख रुपये आणि ४ तोळे सोने घेऊन धूम ठोकली. नवरी मुलगी पळून गेल्याचं लक्षात येताच मेहता कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी लग्न जमवून देणाऱ्या दलालाविरोधात फसवणूकीचा (Crime News) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी पळून गेलेल्या नवरीचा शोध सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या दलाल कमलेश कदम मालाड पोलिसांच्या ताब्यात असून त्याने अशाप्रकारे किती लोकांची लग्नात जुळवून दिले कोणाकोणाची फसवणूक केली याबाबत पोलीस तपास करत आहेत.