मुंबई : बिपोरजॉय चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिमेकडील किनारी राज्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका किनारपट्टीवर पसरला आहे. IMD नुसार, चक्रीवादळ बिपरजॉय येत्या 48 तासांत तीव्र स्वरूप धारण करू शकते. या चक्रीवादळाच्या तडाख्यात चार राज्ये येऊ शकतात असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
अरबी समुद्रातील बिपोरजॉय चक्रीवादळ उत्तरेकडे सरकले आहे आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या पोरबंदर जिल्ह्याच्या दक्षिण-नैऋत्येकडे सुमारे 870 किमी केंद्रस्थानी आहे. त्यामुळे मच्छीमारांना खोल समुद्रातून किनारपट्टीवर परतण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय बंदरांना रिमोट वॉर्निंग सिग्नल जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हे पण वाचा..
खुशखबर! महाराष्ट्र वन विभागात 2138 पदांवर भरती, 12वी उत्तीर्णां नोकरीची संधी
खुशखबर! खाद्यतेलाच्या किरकोळ किमतीत 10 रुपयांनी कपात
महाराष्ट्रात केंद्रप्रमुख पदाच्या 2384 जागांवर मेगाभरतीची घोषणा : एक लाखाहून अधिक पगार मिळेल
धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणीला पळवले; पाहा VIDEO…
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका हा गुजरातला आहे. याशिवाय त्याचा परिणाम महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातही होण्याची भीती आहे. पुढील ४८ तासांत हे चक्रीवादळ आणखी तीव्र स्वरूप धारण करू शकते, असे सांगण्यात येत आहे. चक्रीवादळाचा वाढता धोका लक्षात घेता, गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यासोबतच राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या 11 पथकांनाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, एकीकडे मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर असताना अचानक चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने अनेकांची चिंता वाढली आहे.