श्रीरामपूर (अहमदनगर) : राज्यात महिलांवर सातत्याने अत्याचार होत असल्याचा घटना समोर येत असून नराधमांना कायद्याचा धाकच राहिलेला नसल्याचे दिसून येतेय.दरम्यान, श्रीरामपूर शहरामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे ७० वर्षीय वृद्ध महिलेवर तरूणाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार परिसरात समजल्यानंतर नागरीकांना तरूणाला चांगलाच चोप दिला.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर वृद्ध महिला घरात एकटीच असताना तरूणाने घरात प्रवेश केला. यानंतर तिच्यावर अत्याचार केला. वृद्धेने बचावासाठी (Crime) प्रयत्न केला. परंतु, वृद्धेची ताकद अपुर्ण पडली. महिलेने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरीक धावून आले. यावेळी तरूण पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.
सदरचा प्रकाराची माहिती परीसरात समजताच नागरीकांनी आरोपीला बेदम चोप दिला. यानंतर त्याला पोलीसांच्या स्वाधीन केले. त्याच्यावर श्रीरामपूर (Shrirampur) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलीसांनी (Police) गजाआड केले आहे.