जळगाव, ६ जून (प्रतिनिधी):- जैन हिल्स येथे Future Agriculture Leaders of India (फाली) उपक्रमा अंतर्गत हे ९ वे वर्ष असून पहिले दोन टप्पे पार पडले. या संम्मेलनाचा अंतिम तिसरा टप्पा ७ व ८ जून होत आहे. या तिन्ही टप्प्यामध्ये होणाऱ्या या संम्मेलनास महाराष्ट्र व गुजरात राज्यातील ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील सुमारे ११०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
७ जून रोजी जैन सिंचन, फळ प्रक्रिया, टिश्यू कल्चर आणि इतर प्रक्रियाची माहिती दिली जाईल आणि सायंकाळी फाली विद्यार्थी आधुनिक, प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दुसऱ्या दिवशी ८ जून रोजी जैन हिल्स येथील आकाश ग्राऊंड येथे शेती विषयक नाविन्यपूर्ण संशोधन व संकल्पनेचे स्टॉल्स मांडले जातात. आपण स्वतः विकसीत केलेल्या इन्होव्हेशन्सची माहिती विद्यार्थी देतात. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नावीन्यपूर्ण बिझनेस मॉडेल्स व कृषी इन्होव्हेशन्सच्या स्पर्धेतून पहिल्या पाच क्रमांकाची निवड होऊन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात येते.