मुंबई: गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यापरीक्षेत अपयश आलं त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. उद्यापासून म्हणजेच 07 जूनपासून पुरवणी परीक्षांसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे. तर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 16 जून असणार आहे.
कधी घेतली जाणार परीक्षा?
विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ही जुलै आणि ऑगस्टमध्येच घेतली जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.
हे पण वाचा..
RBI ने घेतला मोठा निर्णय! आता तुम्हाला ही सुविधा मिळणार
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी बातमी : इतक्या मंत्र्यांचा शपथविधी होणार?
चुलत भावाचा झोपेत असलेल्या बहिणीवर जबरदस्तीचा प्रयत्न ; पाचोरा तालुक्यातील घटना
विद्यार्थ्यांना हे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरायचे आहेत. तसंच विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क हे चालान पद्धतीनं भरायचं आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 08 जून ते 22 जूनपर्यंत अर्ज भारत येणार आहेत. तर विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना 17 जून ते 21 जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुरवणी परीक्षा या जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात येणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत अपयश आलं आहे त्यांनी या वेळेत अभ्यास करून पास होण्याची संधी आहे. अप्लाय करण्यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.