पाचोरा (प्रतिनिधी)- तालुक्यातील नगरदेवळा येथे एका घरात अवैधरित्या पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्याने एक पथक तयार करत ३ जुन रोजी नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकत १५ संशयितांना ताब्यात घेत त्यांचे कडुन ९५ हजार २८० रुपयांची रोकड व १ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या ५ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, नगरदेवळा ता. पाचोरा येथे ईश्वर भंडारी यांच्या घरात पत्त्यांचा जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्याने अभयसिंह देशमुख यांनी पोलिस काॅन्स्टेबल संभाजी पाटील, विजय शिंदे, अमृत पाटील, महेश बागुल, अमोल भोसले, श्रीराम कांगणे यांचे पथक नेमुन घटनास्थळी धाड टाकली असता घटनास्थळावरुन कपिल परदेशी, ज्ञानेश्वर फाजगे, सागर पाटील, अनिल शिंदे, फारुख कय्युब, स्वप्निल कोळी, राहुल पाटील, रामचंद्र कुऱ्हाडे, अंबु पाटील, हुसेन पिंजारी, चंदु कुऱ्हाडे, सोनु पाटील, सोनु कुऱ्हाडे, विलास जाधव, ईश्वर भंडारी सर्व रा. नगरदेवळा ता. पाचोरा, विलास जाधव रा. हनुमंतखेडा ता. सोयगाव, संदिप पाटील रा. चुंचाळे ता. पाचोरा यांचेकडुन ९५ हजार २८० रुपये रोख व घटनास्थळावरुन १ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या ५ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.