मुंबई : आजपासून जून महिन्याला सुरूवात झाली आहे. जून महिना सुरु होताच शेतकरी मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतो. अशातच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हवामान खात्याने मान्सूनबाबत महत्वाची अपडेट दिली असून यंदा राज्यात सरासरी 96 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मान्सून मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांत व अरबी समुद्रातील काही भागांमध्ये हजेरी लावण्याची शक्यता आहे. कारण, मान्सून पुढे सरकण्यासाठी आता अनुकूल स्थिती असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
हे पण वाचा…
आजपासून देशात ‘हे’ 5 मोठे बदल, LPG सिलेंडर स्वस्त, इलेक्ट्रिक बाईक घेणे महाग..
छ. संभाजीनगर नंतर आता अहमदनगरचं नामांतर.. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ऑफिसर बनण्याची संधी.. तब्बल 797 पदांवर निघाली भरती
त्यानुसार मान्सूनचा हा वेग पाहता केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये १ जूनला तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहू शकतो.
१५ जूनपासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरू होईल. राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये २० जूनपासून पावसाला सुरुवात होईल तर मान्सूनचा हा टप्पा ८ जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.