चोपडा : मान्सून पावसाळा महिन्याभरावर आला असून त्यापूर्वी शेतकरी बी-बियाणे खरेदी करून ठेवतात. मात्र काही ठिकाणी बनावट बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. अशातच चोपड्यात बनावट कापूस बियाण्याची पाकीटे जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक २४ मे २०२३ रोजी पहाटे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव श्री.अरुण तायडे यांना गुप्त माहितीच्या आधारे चोपडा शहराच्या बाहेरील अग्रवाल पेट्रोल पंपाच्या बाजूला हॉटेल न्यू सुनिता मध्ये बनावट स्वदेशी-५ या नावाच्या वाणाची कापूस बियाणे साठा ठेवला आहे अशी गुप्त खबर मिळाली.
त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव श्री.अरुण तायडे यांनी चोपडा पोलिसांच्या मदतीने हॉटेल न्यू सुनितामध्ये जाऊन चौकशी केली असता संशयित श्री संदीप आधार पाटील रा.वर्डी तालुका चोपडा जिल्हा जळगाव यांनी गाडी खराब झाल्याने दोन प्लास्टिकच्या पिशव्या भरून कापूस बियाणे हॉटेलमध्ये ठेवले होते असे हॉटेलच्या मॅनेजर अमोल राजपूत यांनी सांगितले. त्यावरून श्री.तायडे यांनी चोपडा पोलीस स्टेशन येथे बियाणे कायदा १९६६, महाराष्ट्र कापूस बियाणे नियंत्रण कायदा २००९, बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अन्वये शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी संशय श्री आधार पाटील या.वर्डी रा.चोपडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून बनावट स्वदेशी-५ या कापूस बियाण्याची सुमारे १ लाख रुपये किमतीची ९५ पाकिटे जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
हे पण वाचा..
या आहेत भारतातील 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार? सिंगल चार्जवर इतकी रेंज मिळेल?
बदलतेय हवामान ठरणार डोखेदुखी : राज्यात कुठे पावसाचा इशारा तर कुठे उष्णतेचा अलर्ट
अखेर बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर ; सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी
सिनेसृष्टी पुन्हा हादरली! फेम अभिनेत्रीचं कार अपघातात निधन
शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी परवानाधारक बियाणे विक्री केंद्रातूनच पक्क्या बिलासह परवानाधारक बियाणे उत्पादक कंपनीचे बियाणे खरेदी करावे असे आवाहन नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक श्री.मोहन वाघ यांनी नाशिक विभागातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश नाशिक विभागातील सर्व बियाणे निरीक्षकांना श्री.मोहन वाघ यांनी दिलेले आहेत.