रावेर । जळगाव जिल्ह्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार वाढताना दिसत असून अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याची घटना रावेर तालुक्यात घडलीय. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकार?
रावेर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणारा शाहरूख सरवर तडवी याने पिडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर चार वेळा जबरदस्ती अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार दिला. हा प्रकार पिडीत मुलीने आपल्या आईवडीलांना सांगितला. दरम्यान, पिडीत मुलीसह तिच्या नातेवाइकांनी रावेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.
हे पण वाचाच..
मनाला चटका लावणारी घटना! वाढदिवसाच्या दिवशी कुलरचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू
2000 च्या नोटा बदलण्याबाबत SBI कडून परिपत्रक जारी, ग्राहकांनो काय आहे ताबडतोब जाणून घ्या
‘या’ शेअरने तीन वर्षांत दिला तब्बल 1100% पेक्षा जास्त परतावा, तुम्हीही गुंतवणूक केली आहे का?
साडीतील सुंदर बोल्ड मुलीने शेअर केला डान्सचा व्हिडीओ ; लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहताय..
त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी शाहरूख सरवर तडवी याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले हे करीत आहे.