मुंबई : सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला. कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो”, असं म्हटलं आहे.
आपल्याकडे बहुमत नाही हे उद्धव यांना माहीत होते. उद्धव यांनी नैतिकतेबद्दल बोलू नये. सत्याचा विजय झाला. कायद्यानुसार सरकार स्थापन झाले. आम्ही भाजपसोबत एकत्र निवडणुका लढलो. आम्ही लोकांच्या मताचा आदर केला. बाळासाहेबांच्या विचारांचा आदर केला. उद्धव यांच्या राजीनाम्यात नैतिकतेची भीती नव्हती. नैतिकतेची बाब उद्धव यांना शोभत नाही. शिवसेनेला वाचवण्याचे काम आम्ही केले आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला चिन्ह दिले अशी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या. असे ते म्हणाले.
हे देखील वाचा..
जळगावात यंदाच्या उन्हाच्या पाऱ्याने मोडला रेकॉर्ड ; राज्यात झाली सर्वाधिक तापमानाची नोंद
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय
सशस्त्र सीमा बलमध्ये 10वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्धव गटाने उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही सर्वोच्च न्यायालयाने चिन्ह देणे हा त्यांचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूचीनुसार, राजकीय पक्ष ठरवण्याचा अधिकार स्पीकरला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयानेही राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण मान्य केले आहे, म्हणजे हे सरकार नियमानुसार स्थापन झाले आहे. हे आधीही ठीक होते पण आता त्या लोकांनाही ते स्पष्ट झाले आहे. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार स्थापन करताना तुमची नैतिकता कुठे गेली हा माझा प्रश्न आहे.

