जळगाव: एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले होते. मात्र, यामुळे एप्रिल काही प्रमाणात सुसह्यही झाला होता. आता मेच्या पहिल्याच आठवड्यात सूर्य आग ओकू लागला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली असून काल बुधवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात झाली आहे.
जळगावमध्ये पारा ४४ अंशावर पोहोचला आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून जळगावमध्ये तापमान ४६ वा ४७ अंशाचा टप्पा गाठू शकते असे हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. १५ जूननंतर पारा ४० अंशांच्या खाली येणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी ३४ दिवस जळगावकरांना उष्णतेत राहावे लागणार असल्याने उष्माघातापासून काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
हे पण वाचा..
निकालाधीच उज्ज्वल निकमांनी दिली महत्वाची प्रतिक्रिया, काय म्हणाले पहा..
मोठी बातमी ! जयंत पाटलांना ईडीची नोटीस, नेमकं काय आहे प्रकरण?
मन सुन्न करणारी दुर्देवी घटना! मुलाच्या हळदीचा कार्यक्रम पाहिला अन् आईने सोडले प्राण
10वी ते पदवीधरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! मुंबई येथे 5182 पदांची जम्बो भरती सुरु
दरम्यान, उष्णतेच्या तडाख्याने सकाळी १० वाजेपासून शहरातील जनजीवन प्रभावित होते. दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान ४४.८ अंश तापमान नोंदवले गेले. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोचा वादळाने वातावरणातील बाष्प शोषून घेतल्याने तापमान वाढीचे चटके बसत आहेत.
नागरिकांनी काळजी घेण्याची गरज
दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, दुपारी स्वयंपाक करणे टाळावे, स्वयंपाकावेळी दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवाव्यात, जेणेकरून हवा खेळती राहील. उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळावीत. अनवाणी उन्हात चालू नये. लहान मुलांना व पाळीव प्राण्यांना आतमध्ये ठेऊन गाडी बंद करू नये. चहा, कॉफी, मद्य, खूप साखर असलेली व कार्बोनेडेट द्रव्याचे सेवन टाळावे. प्रथिनांची अधिक मात्रा असलेले पदार्थ तसेच शिळे अन्न टाळावे. सैलसर व सुती कपडे शक्यतो पांढरे कपडे वापरावेत, डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी.