मुंबई : सर्वोच्च न्यायालय थोड्या वेळात राज्याच्या सत्तासंघर्षावरील निकाल देणार आहे. निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतो याकडे अख्या राज्याचं लक्ष लागून आहे. या निकालाधीच कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकमांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उज्ज्वल निकम?
उज्ज्वल निकमांनी सत्तासंघार्षावर प्रतिक्रिया देताना दोन प्रमुख मुद्दे मांडले आहेत. राज्यपालांची कृती सर्वोच्च न्यायालय अयोग्य ठरविण्याची दाट शक्यता आहे, असं त्यांनी म्हटलंय. राज्यपालांची कृती, विशेष सत्र बोलविण्याचं आणि 16 आमदारांच्या आपात्रेचा विषय असे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. आमदारांच्या विरोधात अपात्रेचा निर्णय झाला असताना त्यांना अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणता येतो का, हाही प्रश्न आहे. राज्यपालांची कृती सर्वोच्च न्यायालय अयोग्य ठरविण्याची दाट शक्यता आहे, असं उज्ज्वल निकमांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा..
मोठी बातमी ! जयंत पाटलांना ईडीची नोटीस, नेमकं काय आहे प्रकरण?
मन सुन्न करणारी दुर्देवी घटना! मुलाच्या हळदीचा कार्यक्रम पाहिला अन् आईने सोडले प्राण
10वी ते पदवीधरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! मुंबई येथे 5182 पदांची जम्बो भरती सुरु
मोठी बातमी! निकाल येण्याआधीच विधानसभेचे उपाध्यक्ष नॉट रिचेबल.. राज्यात खळबळ
तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेला राजीनामा व्हॅलेंट्ररी नव्हता. राज्यपालांच्या कृतीमुळे दबाव आहे. त्यामुळं राजीनामा असता तर ते इनव्हॅलेंटरी ठरलं असतं. मग नवाम नबिया केसमध्ये जे घडलं त्या निकालानुसार माजी मुख्यमंत्र्यांची पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली असती. 3 जूनला विद्यमान नियुक्ती केली त्यात ठाकरे गटाच्या आमदारांनी विरोधात मतदान केलं होतं, असं उज्ज्वल निकम म्हणाले.