राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल २-३ दिवसांत येणार; उज्वल निकम यांनी व्यक्त केली शक्यता
मुंबई : शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा यासह अनेक गोष्टींचे भवितव्य अवलंबून असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. . १५ मे पूर्वी कोणत्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय निकाल देऊ शकते. कारण घटनापीठातील एक न्यायाधीश हे 15 मे रोजी निवृत्त होणार आहे. त्यामुळे निकाल त्यापूर्वीच म्हणजेच दोन दिवसांत येऊ शकतो, अशी शक्यता जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाले उज्वल निकम?
जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम म्हणाले, ‘सत्ता संघर्षातील ज्या प्रलंबित याचिका त्या सगळ्यांचा निकाल एकत्रित लागण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय कोणी घ्यायचा हा मूळ प्रश्न त्यात असणार आहे. घटनेच्या दहाव्या परिस्थितीनुसार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेत असतात’.
हे पण वाचा..
ग्राहकांना दिलासा! सोने किमतीच्या दरवाढीला ब्रेक, घट होऊन सोनं इथपर्यंत पोहोचलं?
धक्कादायक ! DRDO चा आणखी एक अधिकारी हॅनी ट्रॅपमध्ये अडकला
नागरिकांनो काळजी घ्या..! जळगावसह राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, वाचा IMD चा इशारा
खळबळजनक! प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, बुलढाणा जिल्ह्यातील घटना
‘तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेची नोटीस बजावली होती. मात्र, त्या सोळा आमदारांनी त्या उपाध्यक्षच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. उपाध्यक्षांना निर्णय घेता येत नसल्याने सर्वोच न्यायालय काय निर्णय घेत याकडे लक्ष आहे, असेही निकम म्हणाले.
‘निर्णय काय होईल हे आज सांगता येणार नाही मात्र कायद्याचा अभ्यास किंवा विश्लेषण करताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की भविष्यात अशा पद्धतीने राज्यात कुठेही सत्ता संघर्षाचा पेच निर्माण होऊ नये, झाल्यास त्याच निराकरण घटनेनुसार व्हावी असा न्यायालयाचा दृष्टिकोन असेल, असेही निकम पुढे म्हणाले