बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्रेड B स्तरावरील अधिकाऱ्यांच्या भरतीसाठीची अधिसूचना जारी केली आहे. तुमचेही रिझर्व्ह बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर हे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
बँकेने जारी केलेल्या RBI ग्रेड बी अधिसूचना 2023 नुसार एकूण २९१ जागा भरल्या जाणार असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया आज, 9 मे पासून सुरू झाली असून 9 जून 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट, rbi.org.in या करिअर विभागात सक्रिय लिंकवर जाऊन किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून संबंधित ऑनलाइन अर्ज पृष्ठाला भेट देऊन अर्ज करू शकतात.
पदाचे नाव –
1) ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल 222
2) ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR 38
3) ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM 31
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
पद क्र.2: अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह PGDM/ MBA (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण)
पद क्र.3: सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा 60% गुणांसह डेटा सायन्स/एआय/एमएल/बिग डेटा विश्लेषण पदवी किंवा 55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण)
वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
परीक्षा शुल्क : अर्जादरम्यान, उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून 850 रुपये (स्वतंत्रपणे जीएसटी) शुल्क भरावे लागेल. आरक्षित श्रेण्यांसाठी, फी फक्त 100 रुपये (जीएसटी वगळून) आहे.
वेतनश्रेणी
35150-1750(9)-50900-EB-1750(2) – 54400-2000(4)-62400 (16 वर्षे)
सुरुवातीला मूळ वेतन 35,150/- प्रति महिना असेल.
आणि DA सह अनेक प्रकारचे भत्ते
याप्रमाणे अर्ज करा
उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जा.
त्यानंतर होमपेजवरील Opportunities नावाच्या विभागात जा.
त्यानंतर Vacancies नावाच्या विभागात जा.
आता येथून आरबीआय ग्रेड बी ऑफिसर रिक्रूटमेंट 2023 नावाची सूचना तपासा.
सूचना काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता देखील तपासा.
आता Apply Online वर क्लिक करा आणि तुमचे सर्व आवश्यक तपशील भरा.
त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
शेवटी अर्जाची फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.