संभाजीनगर : राज्यात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसत आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराकडून फसवणूक सहन न झाल्याने तरुणीने राहत्या घरातील टॉयलेटमध्ये विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली.
कल्पना विठ्ठलराव जाधव (30, रा. नांदेड, ह.मु.मोहिणी अपार्टमेंट, जयसिंगपुरा) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटीत) नर्स होती. तर ज्ञानेश्वर किसन पवार (36, रा. घाटी दवाखाना) असे आरोपीचे नाव असून बेगमपुरा पोलीस ठाण्यात मृत कल्पनाच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना ही 2016 पासून घाटीमध्ये नर्स म्हणून कार्यरत होती. 26 एप्रिल रोजी ती गावी नांदेडला आली. तेथून 30 एप्रिलला कामावर रुजू झाली. 1 मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मृताची आई व भाऊ तिच्या जयसिंगपुरा येथील फ्लॅटवर आले. त्याठिकाणी तिघांनी गप्पा मारल्या. काही वेळाने कल्पना टॉयलेटला गेली. त्याच कालावधीत दोघांना झोप लागली.
हे पण वाचा..
गरीबांच्या धान्यावर डल्ला ; अमळनेर तालुक्यातील तीन दुकानांचे परवाने रद्द
वरमालानंतर वधूने रागाच्या भरात रद्द केले लग्न, कारण वाचून तुम्हीही संतापाल..
ऐन उन्हाळ्यात पाऊस..! हवामानात हा बदल का होतोय? घ्या जाणून..
मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन विवाहितेसोबत ठेवले शारिरीक संबंध ; जळगावातील घटना
दरम्यान, फिर्यादीची दुसरी मुलगी घरी आली. तेव्हा भावाने दरवाजा उघडला. त्यानंतर आई, भाऊ आणि बहिण बोलत असतानाच त्यांनी कल्पना आणखी टॉयलेटमधून बाहेर कशी आली नाही, अशी विचारणा केली. यावेळी तिच्या मोबाईलवर फोन लावला असता, तो बाहेरच होता. त्यानंतर तिघांनी टॉयलेटचा दरवाजा तोडला. तेव्हा कल्पनाने हाताला इंजेक्शन टोचल्याचे दिसून आले.
यानंतर तिला बेशुध्दावस्थेत घाटीत दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर पवारच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक साधना आढाव करीत आहेत.

