नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाने 322 पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. त्यानुसार ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते युपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.nic.in वर जाऊन अर्ज करु शकता. 16 मे 2023 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
रिक्त पदांचा तपशील –
बीएसएफ – 86 पदं
सीआरपीएफ – 55 पदं
सीआयएसएफ – 91 पदं
आयटीबीपी – 60 पदं
एसएसबी – 30 पदं
आवश्यक पात्रता?
कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले सर्व उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. महत्वाचे म्हणजे पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा –
असिस्टंट कमांडंट पदांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 वर्षे असावे. भारत सरकारच्या नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज फी – 200 रुपये शुल्क भरावे लागेल.
हे पण वाचा..
या सरकारी कंपनीत पदवीधरांसाठी बंपर भरती ; 56,100 पगार मिळेल
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.(NTPC) मध्ये नोकरी संधी.. या पदांच्या 120 जागा रिक्त
10वी ते पदवीधरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! मुंबई येथे 5182 पदांची जम्बो भरती सुरु
मुंबईत 34,800 पगाराच्या नोकरीची संधी.. SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक्स झोनमार्फत भरती
असा करा अर्ज –
– सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट upsc.nic.in वर जा.
– त्यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.
– संपूर्ण फॉर्म भरा आणि फी जमा करा.
– यानंतर फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.