चाळीसगाव – केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय नरेंद्र मोदीसाहेबांच्या स्वप्नातील देखो मेरा भारत संकल्पनेतून रेल्वे प्रवाशांना उच्च दर्जाच्या सेवा सुविधा देण्यासंदर्भामध्ये सातत्याने प्रयत्न केले जात आहे.या प्रयत्नांचा भाग म्हणून देशातील विविध भागातील सांस्कृतिक आध्यात्मिक व पर्यटन क्षेत्रातील देशाचा समृद्ध वारसा खऱ्या अर्थाने जनतेला सुलभरीत्या बघता यावा यासाठी भारत गौरव ट्रेनची निर्मिती करण्यात आली असून आज पुण्याहून निघालेली भारत गौरव ट्रेन या पर्यटक गाडीचे चाळीसगाव येथे स्वागत करून प्रवाशांचे अभिनंदन केले.
रेल्वेने प्रवासी व मालवाहू पुरता रेल्वे विभाग सीमित न राहता पर्यटकांसाठी आगळीवेगळी सुविधायुक्त ट्रेन सुरू केल्याने जनतेच्या मनात रेल्वेचा जिव्हाळा वाढवण्यासाठी अशा गाडयांमुळे मोलाची मदत होत आहे. आजच्या भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना लक्झरी प्रवासाचा आनंद घेत देशाच्या वारसा स्थळांना भेट देण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली असून प्रवाश्यांनी देखील आनंद व्यक्त केला असल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज चाळीसगाव येथे दिली.
आज सायंकाळी सात वाजता त्यांच्या हस्ते चाळीसगाव रेल्वे स्थानकावर आज भारत गौरव ट्रेनचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रत्येक डब्याजवळ जाऊन प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी गाडीला खासदार उन्मेशदादा पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवत पुढे रवाना केली. सुरुवातीला स्टेशन प्रबंधक एन पी बडगुजर यांनी खासदार उन्मेशदादा पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी डी आर यू सी सी सदस्य के.बी.दादा साळुंखे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी स्टेशन सल्लागार समितीचे जेष्ठ सदस्य प्रीतमदास रावलानी, विहिप प्रखंड मंत्री विजय बाविस्कर, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील,माजी सदस्य दिनेश बोरसे, आत्मा कमिटी माजी तालुकाध्यक्ष रवीभाऊ चौधरी, नगरसेवक चंदूभाऊ तायडे, बबनदादा पवार, जेष्ठ कार्यकर्ते संजय चौधरी,राकेश कोतकर, योगाचार्य मधुकर कासार, सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेश निकुंभ, डॉ. प्रसन्न अहिरे,सारंग जाधव,अमित सुराणा, सचिन राठोड, ऋषिकेश पाटील,कमर्शियल मॅनेजर श्री.नन्नवरेसाहेब,श्री.मीनासाहेब, स्टेशन प्रबंधक एन पी बडगुजर,विलास मुकणे,अजय खापर्डे, तिकीट निरीक्षक श्री.देशमुख, श्री.धिवरे गणेश मगर, जावेदसर, पोलिस निरीक्षक पि डी पाटील, संजय आहीरे,किसान राख यांच्यासह विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.