पाचोरा,(प्रतिनिधी)- पाचोरा पोलीस स्टेशन येथे दाखल गुरन 105/2021 भादवी कलम 304अ,279,337,338 मधील आरोपी संजय लालचंद साळुंखे रा. सामनेर ता.पाचोरा जि. जळगाव यांना मे.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पाचोरा श्री जी बी औंधकर यांच्या न्यायालयाने सदर गुन्ह्यात दोषी ठरवीले असुन भादवी कलम 304अ मध्ये 2 वर्ष सश्रम कारावास, 279 मध्ये 6 महिने, भादवी कलम 337 मध्ये 6 महिने व भादवी कलम 338 मध्ये 1 वर्ष सक्त मजुरी व 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा दिनांक 25 एप्रिल रोजी सुनावण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक जळगाव, अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग पाचोरा, प्रभारी अधिकारी पाचोरा पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अजय मालचे यांनी केला असुन सरकारी अभियोक्ता रमेश माने यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले आहे. तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ दिपक प्रकाश पाटील व कोर्ट केसवाच म्हणुन पोना. विकास सुर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.