मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाकडून अनेक विविध योजना राबविल्या जात असून यातील एक योजना अशी आहे जी नवविवाहित जोडप्यांना 3 लाख रुपये देणार आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना शासनाकडून तब्बल तीन लाखांपर्यंतची मदत मिळत असते. दरम्यान आज आपण आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना मिळणारी ही तीन लाखाची मदत कशा पद्धतीने मिळते तसेच यासाठी कोण पात्र राहतात? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
या योजनेअंतर्गत कोणत्या जोडप्यांना मिळतो लाभ
कोणत्याही सामान्य प्रवर्गातील वधू किंवा वराने अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील वधू किंवा वराशी विवाह केला असेल तर असे जोडपे तीन लाख रुपये मदतीसाठी पात्र राहतात.
यासाठी मात्र महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत विशेष विवाह कायदा किंवा हिंदू विवाह कायदा, 1955, 1954 अंतर्गत विवाहाची नोंदणी करणे अति आवश्यक बाब आहे.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित मुलाचे वय 21 वर्षे आणि मुलीचे वय 18 वर्षे असणे बंधनकारक आहे.
या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या जोडप्यांनाच दिला जातो.
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी मात्र मुलगा किंवा मुलगी कोणीतरी एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक असते.
केवळ रजिस्टर मॅरेज केलेल्या म्हणजे कोर्ट मॅरेज केलेल्या लोकांनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
हे पण वाचा :- मोठी बातमी! अवकाळी पाऊस अन गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 22 हजार 500 रुपये प्रति हेक्टर पर्यंत मिळणार मदत, GR जारी झाला
किती मिळते मदत
आंतरजातीय विवाहाला उत्साहान देण्यासाठी तसेच आंतरजातीय विवाह केलेल्या नवविवाहित जोडप्यांच्या संसारात हातभार लावण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य शासनाकडून आंतरजातीय विवाह योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला 50 हजाराची रोख रक्कम दिली जाते. यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन तर्फे अडीच लाखांची रक्कम अशा नवविवाहित जोडप्यांना दिली जाते. म्हणजेच एकूण तीन लाख रुपयांची रक्कम या जोडप्याला मिळते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी इथं करा अर्ज
जर आपण आंतरजातीय विवाह केला असेल आणि या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर आपणास sjsa.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
या संकेतस्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपणास महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अर्ज करावा लागणार आहे. यासाठी आंतरजातीय विवाह योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुमच्या पुढ्यात एक फॉर्म उघडेल तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरावा लागेल.
फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर आणि मागितलेली सर्व कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड केल्यानंतर हा फॉर्म तुम्हाला सबमिट करावा लागेल.