भुसावळ : मध्ये रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने पुणे ते कानपूर या दरम्यान नवीन सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. णे ते कानपूर स्पेशल ट्रेन केव्हा सुरु होईल, वेळापत्रक कसं असेल, ही गाडी कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबेल याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
01037 क्रमांकांची पुणे – कानपुर एक्स्प्रेस ही विशेष गाडी 3 मे 2023 ते 15 जून 2023 दरम्यान दर बुधवारी सकाळी 6.35 वाजता पुण्याहून सुटेल.तर दुसऱ्या दिवशी कानपूर सेंट्रलला सकाळी 07.10 वाजेला पोहोचेल. भुसावळ येथे ही गाडी दुपारी 15.55 पोहोचेल
कोणत्या रेल्वे स्टेशनवर मिळणार थांबा?
ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर , कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन आणि उरई या स्थानकावर थांबणार आहे.
हे पण वाचा..
चॉकलेटच्या बहाण्याने चिमुकलीला झोपडीत नेलं अन्.. महाराष्ट्र हादरला
नागरिकांनो..! वाढत्या उष्णतेपासून अशी घ्या काळजी
राज्य मंडळाच्या शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार
मुंबई येथे पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी ; लगेचच करा अर्ज
01038 कानपुर – पुणे
01038 कानपुर – पुणे ही गाडी 4 मे ते 16 जून दरम्यान दर गुरुवारी सकाळी 8:50 वाजता कानपूर सेंट्रलवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:05 वाजता पुण्याला पोहोचेल.
कानपुर येथून निघाल्यानंतर ही गाडी ओराई येथे सकाळी 10.25वा, वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन येथे दुपारी 13.25, बिना येथे सायंकाळी 16.15, राणी कमलापतीला सायंकाळी 18.40, इटारसीला रात्री 20.20 ला, खांडवा येथे 23.30, भुसावळ जंक्शनला रात्री 01.40, मनमाडला पहाटे 05.10, त्यांनतर कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड ला सकाळी 10.27 आणि पुणे येथे 12:05 वाजता पोहोचेल