भडगाव । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत असून अशातच सातबारा उताऱ्यावर वारसांचे नाव लावण्यासाठी १ हजार ५०० रूपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह महिला कोतवालास लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज शुक्रवारी १४ एप्रिल रोजी रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महसुलच्या गोटात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपीतांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
या संदर्भात असे की, तक्रारदार हे भडगाव तालुक्यातील भोरटेक येथील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडे वडीलोपार्जीत जमीन आहे. या जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे लावण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. वारसांची नावे लावण्यासाठी संशयित आरोपी तलाठी सलीम अकबर तडवी (वय-४४) रा.भडगाव, ता.भडगाव जि.जळगाव याने सुरूवातीला १ हजार रूपयांची लाच घेतली होती. त्यानंतर पुन्हा तक्रारदार यांच्याकडे १ हजार ५०० रूपयांची मागणी महिला कोतवाल कविता नंदु सोनवणे (वय-२७) रा.तांदलवाडी, ता.भडगाव जि.जळगाव यांनी सोबत केली.
हे पण वाचा..
शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. अखेर कापसाच्या दरात वाढ ; काय आहे आता प्रतिक्विंटरचा दर?
पुणे महापालिकेत नोकरीची सर्वात मोठी संधी! भरघोस पगार मिळेल
काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात ; फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात खळबळ
सोनाली कुलकर्णीचा ब्यूटीफुल लूक पाहिलात का? फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
त्यानंतर तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणीसाठी विभागाचे शुक्रवारी १४ एप्रिल रोजी दुपारी सापळा रचला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शासकीय सुटी असलीतरी सुट्टीच्या दिवशी शासकीय कामे करण्यासाठी तलाठी आणि कोतवाल हे तलाठी कार्यालयात होते. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून १ हजार ५०० हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. दोन्ही संशयित आरोपीतांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
यांनी केली कारवाई
हा सापळा जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात ईश्वर धनगर, राकेश दुसाने, सफौ दिनेशसिंग पाटील, सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहिरे, पोहेकॉ सुनिल पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, महिला पोहेकॉ शैला धनगर, पोना जनार्दन चौधरी, पोना किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पोना बाळु मराठे, पोकॉ प्रदिप पोळ , पोकॉ सचिन चाटे, पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ प्रणेश ठाकुर यांनी यशस्वी केला.