नवी दिल्ली : उन्हाची तीव्रता सध्या संपूर्ण देशात वाढू लागली असून पुढील दोन महिने सर्वत्र कडाक्याचा उन्हाळा असेल. अशातच यंदाच्या मान्सूनबाबतचा पहिला अंदाज आला आहे. स्कायमेटने २०२३ च्या मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटच्या मते, यंदा मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच पहिल्या अंदाजात पाऊस सामान्यपेक्षा कमी असू शकतो.
स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग यांनी एका निवेदनात सांगितले की, ला निना संपल्यानंतर, एल निनो येत्या काही दिवसांत दार ठोठावणार आहे, त्यामुळे मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे. स्कायमेटने म्हटले आहे की भारतात मान्सूनचा पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 94% असेल. भारतीय हवामान विभाग लवकरच आपला वार्षिक मान्सूनचा अंदाजही जाहीर करू शकतो.
उत्तर आणि मध्य भागात पावसाची कमतरता असेल
भारतातील अर्ध्याहून अधिक शेतकरी भात, मका, ऊस, कापूस आणि सोयाबीन यांसारखी पिके घेण्यासाठी वार्षिक जून-सप्टेंबर पावसावर अवलंबून असतात. देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाच्या कमतरतेचा धोका कायम राहण्याची अपेक्षा स्कायमेटला आहे.
इथे थोडा पाऊस पडेल
स्कायमेटच्या मते, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतातील सुपीक उत्तर, मध्य आणि पश्चिम मैदानी भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गव्हासारख्या पिकांचे लक्षणीय नुकसान झाले आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
मान्सूनमध्ये अल निनोचा धोका मोठा आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. अल निनोचा प्रभाव मे ते जुलै दरम्यान दिसून येईल असा अंदाज आहे. एल निनो म्हणजे समुद्राचे तापमान आणि वातावरणात बदल होत असताना त्याच सागरी घटनेला एल निनो म्हणतात.
हे पण वाचा..
चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव दौऱ्यावर
विक्रमी वाढीनंतर सोने-चांदी दरात मोठी घसरण; ग्राहकांना खरेदीची मोठी संधी..
तुम्हीही सरकारी नोकरी शोधताय? NPCIL मार्फत निघाली मोठी भरती; दरमहा 56000 पगार मिळेल
गर्लफ्रेंडला भेटायला आला अन् तिच्याच मैत्रिणीबरोबर केलं धक्कादायक कृत्य
कोणत्या महिन्यात किती पाऊस ?
• 165.3 मिमी या सरासरीच्या तुलनेत जूनमध्ये 99 टक्के पाऊस पडू शकतो
• सामान्य पावसाची शक्यता 70 टक्के
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 10 टक्के
• सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 20 टक्के
• 280.5 मिमी या सरासरीच्या तुलनेत जुलैमध्ये 95 टक्के पाऊस पडू शकतो
• सामान्य पावसाची शक्यता 50 टक्के.
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 20 टक्के
• सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 30 टक्के
• 254.9 मिमी या सरासरीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये 92 टक्के पाऊस पडू शकतो
• सामान्य पावसाची शक्ययता 20 टक्के
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 20 टक्के
• सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 15 टक्के
• 167.9 मिमी या सरासरीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये 90 टक्के पाऊस पडू शकतो.
• सामान्य पावसाची शक्यता 20 टक्के
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 10 टक्के
• सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 70 टक्के