कृषी आयुक्तालय व कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी दि.०३ एप्रिल २०२३ ते दि. ०६ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीच्या अनुषंगाने दि.१३/०७/२०२३ ते दि. २२/०७/२०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज प्रणाली खुली करण्यात येणार असून जे उमेदवार यापूर्वी अर्ज करु शकले नाहीत, ते उमेदवार सदर कालावधीत अर्ज करु शकतील. तथापि जाहिरातीतील नमूद केलेल्या वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव, पात्रता, परीक्षा शुल्क इतर सर्व संदर्भातील अटी व शर्ती कायम राहतील, असे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
रिक्त पदांचा तपशील
1) लघुटंकलेखक
2) लघुलेखक (निम्न श्रेणी)
3) लघुलेखक (उच्च श्रेणी)
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2023
जाहिरात (Notification): पाहा