पुणे : मार्च महिन्यात धुमाकूळ घातल्यानंतर आता एप्रिल महिन्यात पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील विविध भागात पावसाचा अदांज जारी करण्यात आलेला आहे या अवकाळी पावसामुळे शेतीसमोर पुन्हा संकट असणार आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
४ ते ७ एप्रिल दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्मिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये ६ आणि ७ एप्रिल रोजी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानंतर मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्येही ६ आणि ७ एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरमध्ये ४ आणि ५ एप्रिल रोजी पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.
मार्चमध्ये कुठे कुठे पाऊस
साधारणपणे मार्चमध्ये पाऊस होत नाही. मेच्या अखेरीस अवकाळी पाऊस पडतो. पण यंदा मार्चमध्येच पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर-पश्चिमेकडील काही राज्यातही पाऊस झाला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीत पाऊस झाला. चंदीगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र आणि राजस्थानातही मोठा पाऊस झाला. या ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.