बागेश्वर धामचे पीठाधीश्वर Dhirendra Krishna Shastri म्हणजेच बागेश्वर बाबा यांनी आता shirdi च्या saibaba यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.यापूर्वी bageshwar dham Sarkar यांनी संत तुकाराम महाराज यांच्याविषयीही वादग्रस्त विधान केलं होते. त्यावेळीही त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेतलं होते. त्यांनी माफी देखील मागितली होती.
काय म्हणाले बागेश्वर धामचे पीठाधीश्वर
“संताची पूजा करायची तर हिंदूंमध्ये संत कमी आहेत का? तुलसीदास, सूरदास किंवा इतर कोणतेही संत असोत ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते ईश्वर नाहीत. त्याचप्रमाणे saibaba साईबाबा हे संत असू शकतात, फकिर असू शकतात. मात्र, ईश्वर नाही,” असे ते म्हणाले.
“शिर्डीच्या साईबाबांची पूजा करावी की नाही,” असा प्रश्न एका भक्तांने बागेश्वर बाबांना विचारला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं.”शंकराचार्य यांनी साई बाबांना ईश्वराचे स्थान दिलेले नाही. शंकराचार्य यांचे मत मानणे अनिवार्य आहे. त्यांच्या मताचे पालन करणे प्रत्येक सनातनी व्यक्तीचे कर्तव्य आहे.
Dhirendra Krishna Shastri
शंकराचार्य हे धर्माचे पंतप्रधान….
पुढे बोलतांना ते म्हणतात की शंकराचार्य हे धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असोत अथवा दुसऱ्या त्यांना ईश्वराचे स्थान देता येणार नाही,” असेही ते म्हणाले.”गीदड की खाल ओढकर कोई शेर नही बन सकता” (गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही.) मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. परंतु मी हे बोलणेदेखील गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.